Wednesday, April 9, 2014

राजकारण



राजकारण राजकारण
आहे का हे जनतेच्या
कल्याणाचे कारण ?

इथे असते फक्त
मंत्र्या -मंत्र्यांची झोंबी,
मिळावी खुर्ची म्हणून
करतात सर्वत्र बोंबाबोबी

किती असतात हे मंत्री
भाषणाच्या उत्साहात,
दाखवतात त्यांची आणीबाणी
शब्दांच्या वारात

लावतात शेजारी- शेजारी
विरुद्ध पक्षांच्या मंत्र्यांचे चित्र,
पाहून वाटेल ते आपल्याला
हे आहेत एकमेकांचे मित्र

लागलेली असते त्यांना 
फक्त खुर्चीची चाहूल,
म्हणून इकडे-तिकडे  भरकटत 
असतात त्यांचे पाऊल

जिथे कधीही भरकटत 
नाही कुत्री,
निवडणूकीच्यावेळी तिथेही
येतात मंत्री

अन्न वस्त्र निवारा
या गोष्टींची दाखवतात हमी,
आणि जनतेचे मनही
फुलवून टाकतात आनंदमयी

मत दया, आम्हाला मत दया
अशी भिक मागत सुटतात मतांची,
कारण गरज असते त्यांना
जनतेच्या अंगठयाची

एका पाठोपाठ येतात सारे
निवडणूकीच्या वेळी,
झाली का ती एकदा 
कोणीही येत नाही जनतेच्या संकटावेळी

2 comments:

  1. खुप छान ....अगदी मोजक्या शब्दांत राजकीय नेत्यांचे अचूक वर्णन.... राजकारण सर्वच क्षेत्रात आज आघाडीवर आहे . मग ते राजकीय असो की सामाजिक सुशिक्षित व्यक्तीसुध्दा पैशासाठी ... सत्तेसाठी राजकारण करतात..... Blog वाचायला तसा खुपच उशीर झाला.

    ReplyDelete