Thursday, April 3, 2014

अवेळीचा पाऊस

         



कसा आला तो
हे कोणालाच समजल नव्हत 

फाल्गुन मासात त्याला
कोणीही पाहिलं नव्हत

कसा आला अचानक
सरसर करत
सर्वांचीच केली त्याने पंचाईत

यायचा अगदी सायंकाळी
लहानानांच नव्हे तर
मोठ्यांनाही वाटायचा तो त्रासदायी

तरुणाईने लुटलं मनसोक्त त्याला
गेले दूर-दूर त्याच्या संगतीत फिरायला

पाहून वाटल जणू शिमला कुल्लु-मनाली
कळूनी  आले नंतर घेतले त्याने पुष्कळ गोष्टींचे बळी

केले नुकसान खूप जागी त्याने
झाडला जणू गोळीबार गारपिठांच्या साह्याने 

5 comments: