निलकमळ आहे तुझी काया,
तुझ्या नयनांमध्ये आहे जादुची माया।।
शोभुनि दिसते हे मोर पंख तुझ्या केसात,
खुलुनि हसते बासरी तुझ्या हातात ।।
तुझे हे मऊ मुलायम ऒठ
स्पर्श करताच त्या बासरीला,
आनंदाने गाऊ लागते
ती तुझ्या सुराला ।।
दही लोणी घेतोस जेव्हा
तू तुझ्या मुखात,
मिसळुनी जातात ते सुद्धा
तुझ्या आयुष्यात ।।
तुझी ही नाजुक पाऊल
नाचू धावू लागतात अंगणात,
फुलासारखा बहरून जातोस
तू गोप-गोपिकांच्या मनात ॥
nice 1
ReplyDeletechhaan kaviata aahe :)
ReplyDeleteawesome n <3ly thoughtss dearr...:)
ReplyDeletemastach :)
ReplyDelete