Thursday, April 24, 2014

फक्त तुझ्यासाठी



कळत नाही मला
कसे शब्द उमटावे
परंतु वाटते तुझ्यासाठी
काहीतरी लिहावे…

तुझ्या पहिल्या भेटीपासून
आठवते सर्व काही
तुझ्या नाजूक-साजूक गोष्टी
आणि अबोल दृश्य काही…

तुझ्या हसण्या-वागण्याने
वेड लागले या मनाला
तुझ्या मृदू-नाजूक स्वभावाचे
बोल सांगेन मी या जगाला…

होत्या सर्व गोष्टी स्वप्नात
उतरवल्यास तू त्या प्रत्यक्षात
होते सर्व काही गंमतीत
झाले त्याचे रुपांतर जंमतीत…

भरू दे सर्व सुख तुझ्या आयुष्यात
आणि असाच बहरून राहा माझ्या जीवनात…

Friday, April 11, 2014

पहिली भेट

आठवते ती पहिली भेट मला
अजूनही फुलतो रोमांच मनातला

भेटायच आपल ठरल जेव्हा
भिती वाटली थोडीशी मनाला तेव्हा

कधीच भेटले नव्हते लपून अस
तुही केलास नव्हत चुकून अस

होती ती दोघांचीच भेटायची पहिली वेळ
होतो आपण उत्सुकात त्या वेळ

एकांतात जाणल मी तुला
जाणल तुझ्या भावूक मनाला

तुटक-मुटक चालल होत सवांद
गुंतलो होतो आपण एकमेकांच्या नादात

कळले तेव्हा तुझे वेडे मन आहे माझ्या प्रेमात
तेव्हांच पडले सख्या, मी तुझ्या प्रेमात… 

गीता गोसावी 



Wednesday, April 9, 2014

राजकारण



राजकारण राजकारण
आहे का हे जनतेच्या
कल्याणाचे कारण ?

इथे असते फक्त
मंत्र्या -मंत्र्यांची झोंबी,
मिळावी खुर्ची म्हणून
करतात सर्वत्र बोंबाबोबी

किती असतात हे मंत्री
भाषणाच्या उत्साहात,
दाखवतात त्यांची आणीबाणी
शब्दांच्या वारात

लावतात शेजारी- शेजारी
विरुद्ध पक्षांच्या मंत्र्यांचे चित्र,
पाहून वाटेल ते आपल्याला
हे आहेत एकमेकांचे मित्र

लागलेली असते त्यांना 
फक्त खुर्चीची चाहूल,
म्हणून इकडे-तिकडे  भरकटत 
असतात त्यांचे पाऊल

जिथे कधीही भरकटत 
नाही कुत्री,
निवडणूकीच्यावेळी तिथेही
येतात मंत्री

अन्न वस्त्र निवारा
या गोष्टींची दाखवतात हमी,
आणि जनतेचे मनही
फुलवून टाकतात आनंदमयी

मत दया, आम्हाला मत दया
अशी भिक मागत सुटतात मतांची,
कारण गरज असते त्यांना
जनतेच्या अंगठयाची

एका पाठोपाठ येतात सारे
निवडणूकीच्या वेळी,
झाली का ती एकदा 
कोणीही येत नाही जनतेच्या संकटावेळी

Thursday, April 3, 2014

अवेळीचा पाऊस

         



कसा आला तो
हे कोणालाच समजल नव्हत 

फाल्गुन मासात त्याला
कोणीही पाहिलं नव्हत

कसा आला अचानक
सरसर करत
सर्वांचीच केली त्याने पंचाईत

यायचा अगदी सायंकाळी
लहानानांच नव्हे तर
मोठ्यांनाही वाटायचा तो त्रासदायी

तरुणाईने लुटलं मनसोक्त त्याला
गेले दूर-दूर त्याच्या संगतीत फिरायला

पाहून वाटल जणू शिमला कुल्लु-मनाली
कळूनी  आले नंतर घेतले त्याने पुष्कळ गोष्टींचे बळी

केले नुकसान खूप जागी त्याने
झाडला जणू गोळीबार गारपिठांच्या साह्याने 

Tuesday, April 1, 2014

कान्हा






निलकमळ आहे तुझी काया,
तुझ्या नयनांमध्ये आहे जादुची माया।।


शोभुनि दिसते हे मोर पंख तुझ्या  केसात,
खुलुनि हसते बासरी तुझ्या  हातात ।।


तुझे हे मऊ मुलायम ऒठ
स्पर्श करताच त्या बासरीला,
आनंदाने गाऊ लागते
ती तुझ्या सुराला ।।


दही लोणी घेतोस जेव्हा
तू तुझ्या मुखात,
मिसळुनी जातात ते सुद्धा
तुझ्या आयुष्यात ।।


तुझी ही नाजुक पाऊल 
नाचू धावू लागतात अंगणात,
फुलासारखा बहरून जातोस
तू गोप-गोपिकांच्या मनात ॥